आमदार दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
सावंतवाडी,
माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सपत्नीक येथील काझी शहाबुद्धीन मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
हे पण वाचा विशाल परब यांनी वेंगुर्लेत मतदारांसह उमेदवारांची घेतली भेट
प्रत्येक नागरिकाने आपला हक्क बजावून एक मजबूत लोकशाही घडवण्यासाठी हातभार लावावा,’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. केसरकर यांच्या मतदानामुळे सावंतवाडी मतदारसंघातील मतदानाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळाली असून, इतर नागरिकांनीही केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.


