ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गासाठी TBM यंत्रणेला मुख्यमंत्री फडणवीस यांचा शुभारंभ 

0
134

मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी भुयारी मार्ग प्रकल्पा’साठी टनेल बोरिंग मशीन (TBM) चा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाच्या सुरुवातीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यास महत्त्वाची मदत होणार आहे.

हे पण वाचा नगरपंचायत निवडणूक मतमोजणी २१ डिसेंबरला; आचारसंहितेच्या सावटात हिवाळी अधिवेशन

या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. TBM तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती भागात जलद आणि अत्याधुनिक पद्धतीने भुयारी मार्गाची उभारणी केली जाणार आहे.

या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील ट्रॅफिकची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या प्रवास वेळेतही लक्षणीय बचत होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here