नवी मुंबई महापालिकेत अधिकारी-कर्मचारी हिताय मोठे निर्णय

0
110

नवी मुंबई महापालिकेत अधिकारी-कर्मचारी हिताय मोठे निर्णय

अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी

नवी मुंबई | प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचारी हिताच्या प्रशासकीय बाबींवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा विशेष भर असून, मार्च 2024 ते नोव्हेंबर 2025 या दीड वर्षाच्या कालावधीत 937 अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती, अनुकंपा व वारसा हक्क यांचा लाभ मिळाला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रशासकीय प्रश्न मार्गी लागले असून अधिकारी-कर्मचारीवृंद मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे पण वाचाभारतीय सैन्य इंटर्नशिप कार्यक्रम २०२५: WARDEC मध्ये इंटर्नसाठी संधी

महापालिकेच्या कार्यक्षमतेत वाढ आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी आयुक्त डॉ. शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय बाबींसाठी विशेष समिती गठीत केली. या समितीमार्फत नियमित आढावा घेतले जात असून, अधिकारी-कर्मचारीवृंदाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना आता गतीमान झाल्या आहेत.

यामध्ये गट ‘अ’ ते गट ‘क’ मध्ये 378 अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नती मिळाली असून, गट ‘अ’ मध्ये 42, गट ‘ब’ मध्ये 122 आणि गट ‘क’ मध्ये 214 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच 515 अधिकारी-कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी पुढील प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे.

महापालिकेच्या 4124 पदांपैकी 2266 पदे भरलेली असून, गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गाच्या 668 पदांची भरती अंतिम टप्प्यात आहे. तसेच अनुकंपा तत्वावर 33 उमेदवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, वारसा हक्क समितीच्या शिफारसीनुसार गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती दिली गेली आहे.

साथीच्या आणि सुधारित प्रशासनासाठी महापालिकेने 150 दिवसांच्या कृती कार्यक्रम अंतर्गत सर्व बिंदू, नामावली व तपासणी शासनास सादर केली आहे. याशिवाय सुशासनाच्या दृष्टीने नवीन कक्ष व सुधारित संरचना तयार करण्याचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले असून, पाणीपुरवठा, मोरबे मुख्यालय, दक्षता व गुणवत्ता नियंत्रण, माहिती व तंत्रज्ञान, आर्थिक नियोजन, GIS आणि वाहतूक नियोजन यांसारखे कक्ष सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कृतीशील आणि लोकाभिमुख प्रतिमेसाठी कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांच्या हितासाठी निर्णय घेण्यात येत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय मार्गी लागल्याबद्दल अधिकारी-कर्मचारीवृंद समाधान व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here