फासकीत अडकलेला बिबट्या खारेपाटणमध्ये जेरबंद
तळेरे :
खारेपाटण संभाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक लावलेल्या फासकीत बिबट्याला वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद केले. फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती खारेपाटण उपसरपंच महेद्र गुरव यांनी वन विभागाला दिलो.
हे पण वाचा दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत
सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहायक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, पशुधन विकास अधिकारी सारिका दहिफळे यांनी खारेपाटण येथे जाऊन बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. यात वनपाल धुळू कोळेकर ओकृष्ण परीट, वनरक्षक सुखदेव गळवे, विजय भोसले, प्रशांत कांबळे, शुभम पाटील, अंकुश माने, स्वाती व्हनवाडे, रोहित सोनगेकर, वाहनचालक सागर ठाकूर, रिदेश तेली, मपूर राणे, नीलेश मोस्ये तसेच सरपंच खारेपाटण प्राची इस्वलकर, सागर खांडेकर यांनी सहकार्य केले.
One attachment •


