अजितदादांच्या विमानात 5 नव्हे 6 प्रवासी – उज्ज्वल निकम

0
20
अजितदादांच्या विमानात 5 नव्हे 6 प्रवासी - उज्ज्वल निकम
अजितदादांच्या विमानात 5 नव्हे 6 प्रवासी - उज्ज्वल निकम

अजितदादांच्या विमानात 5 नव्हे 6 प्रवासी – उज्ज्वल निकम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि भाजपचे राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे. आता या विमान अपघातावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि भाजपचे राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, पुराव्याशिवाय या घटनेला वेगळी कलाटणी देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक प्रश्न उपस्थित केला होता. “विमान अपघातात आधी सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मग घटनास्थळी केवळ पाच जणांचेच मृतदेह कसे सापडले?” असा सवाल मिटकरी यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे या अपघातामागे काही घातपात होता का? अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here