बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बिल्डिंगबाहेर गोळीबार प्रकरणात 4 आरोपींना अटक

0
20

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बिल्डिंगबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात 4 आरोपींना अटक केल्यानंतर आता पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराजवळी गोळीबार प्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा गोळीबार रोहित शेट्टीला संपवण्यासाठी करण्यात आला अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शेट्टीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
शनिवारी 31 जानेवारीला रात्री मुंबईतील जुहू येथील रोहित शेट्टीच्या शेट्टी टॉवर या बिल्डिंगबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात पुण्याहून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार असल्याचं सांगितलं जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here