म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री

0
57
म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री
म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री

म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री

मुंबई l प्रतिनिधी

म्हाडाच्या माहितीनुसार, यामध्ये यापूर्वी सोडतीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या, मात्र काही कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा समावेश आहे. इच्छुक नागरिकांना म्हाडाच्या अधिकृत Book My Home पोर्टलवर अर्ज सादर करता येणार आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरून सदनिका निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत विविध वसाहतींमधील एकूण १२० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही विक्री ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

सदनिका निवड झाल्यानंतर संबंधित विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा ४८ तासांच्या आत करणे बंधनकारक असेल. ही रक्कम वेळेत न भरल्यास सदनिकेवरील हक्क आपोआप रद्द होणार आहे.

घाटकोपर पू, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि अंधेरी पश्चिम (जेव्हीपीडी) परिसरात असून अशा एकूण ३६ सदनिका विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here