अजित पवारांचा मृत्यू रहस्यमयी? शिवसेना नेते संजय राऊत
अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील एका इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्याचा विमान अपघातात (Ajit Pawar Plane crash) मृत्यू होणं आणि त्यानंतर समोर येत असलेली तथ्ये पाहता, या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्न नक्कीच उपस्थित केले जातील, प्रश्न विचारलेच पाहिजेत. अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा ज्या पद्धतीने विमान अपघातात मृत्यू झाला आणि जे तथ्य समोर येत आहेत – त्याची चौकशी झाली पाहिजे, मला वाटतं की यात काहीतरी संशयास्पद आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर त्यांनी मोठे आरोप केले.


