अनंत चतुर्दशीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले श्री कसबा गणपतीचे दर्शन

0
9

पुणे :
अनंत चतुर्दशीनिमित्त पुण्यातील महात्मा फुले मंडई चौकात सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्याचे ग्रामदैवत व मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी गणरायाच्या चरणी पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना केली. तसेच बळीराजावरील संकटे दूर होऊन शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली असून, मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here