माथाडी कायदा अधिक मजबूत करणार; वडाळ्यात ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे देणार : मुख्यमंत्री फडणवीस

0
14
वडाळ्यात ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे देणार : मुख्यमंत्री फडणवीस
वडाळ्यात ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे देणार : मुख्यमंत्री फडणवीस
माथाडी कायदा अधिक मजबूत करणार; वडाळ्यात ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे देणार : मुख्यमंत्री फडणवीस
नवी मुंबई :
माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून, तो अधिक मजबूत केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथे आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
वडाळा येथील गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून सुमारे २,८५० ते ३,००० माथाडी कामगारांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. भविष्यात माथाडी कामगारांसाठी आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील माथाडी मंडळांचे सक्षमीकरण व पुनर्रचना करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. कामकाजात पारदर्शकता राहण्यासाठी लेखापरीक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असून, माथाडी कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागानुसार, १९६९ च्या माथाडी कायद्यांतर्गत राज्यात माथाडी मंडळांची व्यवस्था कार्यरत आहे.
दरम्यान, वाशी एपीएमसीच्या भविष्यातील पुनर्विकासाचाही मुद्दा या मेळाव्यात चर्चेत आला. पुढील ५० वर्षांचा विचार करून बाजारपेठेचा आधुनिक पद्धतीने विकास करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here