रायगड पोलीस बँड पथकाचे भक्तीमय सूर; गणेशोत्सवात सुरक्षितता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश
रायगड पोलीस बँड पथकाचे भक्तीमय सूर; गणेशोत्सवात सुरक्षितता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश
रायगड :
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात रायगड पोलीस बँड पथकाने आपल्या सुमधुर वाद्यवृंदातून भक्ती आणि जनजागृतीचा अनोखा संगम साधला. जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देत पोलीस बँड पथकाने सुरेल सादरीकरणातून नागरिकांशी संवाद साधला.
वाद्यवृंदाच्या सुमधुर सुरांसोबतच नागरिकांमध्ये सुरक्षितता, शांतता आणि सामाजिक सलोखा याबाबत जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सव हा भक्ती आणि उत्साहाचा सण असतानाच तो शांततेत, सुरक्षितपणे आणि सामाजिक एकोपा राखून साजरा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
‘सुरांतून संवाद, संगीतातून जनजागृती आणि खाकीतून विश्वास’ या भावनेतून रायगड पोलीस बँड पथकाचा हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. भक्तीच्या उत्सवासोबत सुरक्षिततेचा संकल्प करण्याचे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले.