दुर्गापूजा आणि दिवाळीसाठी कोकण रेल्वेवर विशेष साप्ताहिक गाडी

0
11
दुर्गापूजा आणि दिवाळीसाठी कोकण रेल्वेवर विशेष साप्ताहिक गाडी
दुर्गापूजा आणि दिवाळीसाठी कोकण रेल्वेवर विशेष साप्ताहिक गाडी

दुर्गापूजा आणि दिवाळीसाठी कोकण रेल्वेवर विशेष साप्ताहिक गाडी

सावंतवाडीसह कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबा

कोकण :
दुर्गापूजा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर तिरुवनंतपुरम सेंट्रल–मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम सेंट्रल दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालविण्यात येणार आहे. ६०१३/६०१४ क्रमांकाची ही विशेष गाडी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात नियोजित फेऱ्या करणार आहे.
६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल–मदार जंक्शन विशेष गाडी २१ व २८ ऑक्टोबर तसेच ४, ११ आणि १८ नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळी ७.४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटणार आहे.
तर ६०१४ मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम सेंट्रल विशेष गाडी २४ व ३१ ऑक्टोबर तसेच ७, १४, २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी शनिवारी रात्री ९.४० वाजता मदार जंक्शन येथून रवाना होणार आहे.
या विशेष गाडीला कोकणातील सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि वसई या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. दुर्गापूजा आणि दिवाळीच्या काळात प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ होणार असून, कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here