नवी मुंबईतील गणेशोत्सवाला जागतिक व्यासपीठ; Bappa.org वर घरगुती व सार्वजनिक गणपतींची नोंदणी करण्याचे आवाहन

0
9

नवी मुंबई :
नवी मुंबईतील विसर्जन स्थळांवर गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणारे बोर्ड्स लावण्यात आले असून, नागरिकांनी आपल्या घरगुती किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाची Bappa.org या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून स्थानिक गणेशोत्सवाची माहिती जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमांतर्गत ‘गाथा गणेश कथांची’ या उपक्रमात नागरिकांना आपल्या घरगुती किंवा गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची छायाचित्रे अथवा व्हिडीओसह माहिती Bappa.org पोर्टलवर अपलोड करता येणार आहे. त्यामुळे आपल्या गणेशोत्सवाची माहिती व्यापक स्तरावर प्रदर्शित होण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून, या उत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या गणेशोत्सवाची माहिती नोंदवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here