भारत–यूएई सहकार्य वाढविण्यावर चर्चा; नवनियुक्त राजदूत अब्दुल्ला सैफ अल नुआइमी यांची राज्यपालांशी भेट

0
13

मुंबई :
संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील नवनियुक्त राजदूत अब्दुल्ला सैफ अल नुआइमी यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये वैद्यकीय, पर्यटन, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील सहकार्य, परस्पर लोकसंपर्क वाढविणे तसेच भारत–यूएईदरम्यान विमानसेवा अधिक सक्षम करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल मर्झुकी यांच्यासह दूतावासातील अधिकारी उपस्थित होते. भारत आणि यूएईमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here