अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाची कठोर भूमिका

0
18
अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाची कठोर भूमिका
अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाची कठोर भूमिका

अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाची कठोर भूमिका

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रताप सरनाईक यांनी Ola, Uber आणि Rapido सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी सायबर क्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

यासंदर्भात परिवहन आयुक्तांनीही सायबर क्राईम विभागाला स्वतंत्र पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा नियमांचे पालन न करता या ॲपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः Rapido सारख्या सेवांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले आहे.

राज्यातील प्रवासी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा सेवांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here