अबू धाबीतील बँक ऑफ बडोदा खटल्यात विधि ज्ञहरीश साळवे उतरले मैदानात
अबू धाबीतील बँक ऑफ बडोदा खटल्यात विधि ज्ञहरीश साळवे उतरले मैदानात
नवीदिल्ली l प्रतिनिधी
अबू धाबी ग्लोबल मार्केट (ADGM) न्यायालयात सुरू असलेल्या बँक ऑफ बडोदा प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवेबँकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती देताना साळवे यांनी हा विषय “आमच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न” असल्याचे नमूद केले.
भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर हजर राहत साळवे यांनी सांगितले की मे आणि जून महिन्यात अबू धाबी येथे महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रकरण जुलैपर्यंत तहकूब करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली. “अबू धाबीमध्ये मे-जूनमध्ये खटला सुरू होणार आहे. मी तिथे नसल्यास मोठी अडचण निर्माण होईल,” असेही त्यांनी नमूद केले.
हे प्रकरण बँक ऑफ बडोदाच्या परदेशातील व्यवहारांशी संबंधित असून संयुक्त अरब अमिरातीतील NMC Health या कंपनीच्या पतनानंतर उद्भवलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपांशी जोडलेले आहे.
२०१९मध्येआर्थिक खुलाशांवरील शंकांमुळे एनएमसी हेल्थकेअरवर छाननी सुरू झाली आणि त्यानंतर अब्जावधी डॉलर्सची अघोषित देणी उघडकीस आली. परिणामी २०२० मध्ये कंपनीचे व्यवहार निलंबित करण्यात आले आणि अबू धाबी ग्लोबल मार्केट न्यायालयात दिवाणी कार्यवाही दाखल झाली.
कर्जदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सुरू असलेल्या या कार्यवाहीत एनएमसीच्या आर्थिक व्यवस्थापनातील कथित चुकीच्या स्टेटमेंट्स आणि अनियमित वित्तपुरवठा यांची तपासणी होणार आहे.
एनएमसी कोसळण्यापूर्वी संबंधित वित्तीय संस्थांची भूमिकाही या खटल्यात तपासली जाणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कायदेशीर संस्थांचीही नियुक्ती करण्यात आली असून हा खटला नियामक तसेच प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.