अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी बैठक काय घडले?

0
42
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी बैठक काय घडले?
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी बैठक काय घडले?

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी बैठक काय घडले?

मुंबई l प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. 27 जानेवारी 2026 रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत नक्की काय घडले हे सांगताना देवेंद्र फडणवीस दिसले आहेत.

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार होते. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून या अर्थसंकल्पाची तयारी करत होते. मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या विमानाची भीषण अपघात झाला.

शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कधीच असा विचार केला नव्हता की, असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल. लाडकी बहीण योजना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट घालून सुरू केली आणि आम्हाला सर्वांनाही गुलाबी जॅकेट घालायला लावले होते. अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणे ही घटनात्मक जबाबदारी आहे, पण ही गोष्टी माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. दुर्देवाने अजितदादा आपल्यात नाहीत, ही खंत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

कदाचित ते आमच्यासोबत उशिरा आले. पण एक दहशकापासून आमची चांगली मैत्री होती आणि जवळीकता होती. 2014 नंतर एक भावनिक नातं अजित पवार यांच्यासोबत झालं. सगळ्या गोष्टी आता फक्त आठवणीत राहिल्या. दादा अंत:करणातून प्रेम करणारे नेते होते. 27 जानेवारीला आमची बैठक झाली. त्याही बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना प्रश्न केले. ती सर्व बैठक आम्ही संपवली.

पान ४ वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here