दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गेला- देवेंद्र फडणवीस

0
19
दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गेला- देवेंद्र फडणवीस
दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गेला- देवेंद्र फडणवीस

दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गेला- देवेंद्र फडणवीस

मुंबई l प्रतिनिधी

राज्यात आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. यावेळी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणीला उजाळा देताना देवेंद्र फडणवीस दिसले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशात अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कधीही असा विचार केला नाही की, अशाप्रकारचा प्रस्ताव मला मांडावा लागेल. मी माझा जवळचा एक मित्र गमावला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 27 जानेवीरी 2026 रोजी अजित पवार यांच्यासोबतच्या बैठक काय घडले आणि ती शेवटची दादांसोबत भेट होती, याची किंचतही कल्पना नव्हती. दादा कधीही वेळ चुकवणारे नव्हते. मात्र, अपघाताच्या दिवशी त्यांची वेळ चूकली. अजित पवार शब्दाला जागणारा माणूस होता. दादांना सामान्य माणसांच्या अडचणी माहिती होत्या. अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रिपदाची क्षमता होती, असेही मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. अजित पवार सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते.

शेवटी राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे गणिते असतात. पण क्षमतेचा विचार केला असता मुख्यमंत्री पदाकरिता पूर्णपणे क्षमता असलेले नेतृत्व अजित पवारांचे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दु:ख बाजूला सारून सुनेत्रा वहिणी कामाला लागल्या. विकासप्रकल्पांच्या बाबतीत अजित पवार कायमच सकारात्मक असायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here