अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’
केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवे दरवाजे खुले झाले असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीवर विशेष भर देण्यात आला आहे. महिलांपासून मच्छीमारांपर्यंत, शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्व घटकांसाठी लाभदायक तरतुदी करण्यात आल्याने पालघर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे मत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील मुलींच्या सुरक्षितता आणि शिक्षणाला प्राधान्य देत सुसज्ज ‘गर्ल्स हॉस्टेल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण मिळणार असून शिक्षणातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच गावातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शी मार्ट’ सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी मिळून आर्थिक स्वावलंबन वाढेल.
पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या काजू आणि नारळाला ‘जागतिक ब्रँड’ म्हणून विकसित करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
पान ४ वर


