‘NYPS 2.0’ वेब पोर्टल सादर
पुणे शहर व परिसरात वेगाने होत संसदीय कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय युवा संसद योजना (NYPS) वेब पोर्टलची सुधारित आणि अधिक सुलभ अशी NYPS 2.0 आवृत्ती सादर केली आहे. या नव्या पोर्टलमुळे देशभरातील तरुणांना संसदीय लोकशाहीची समज वाढविण्याची आणि सक्रिय सहभाग घेण्याची अधिक व्यापक संधी उपलब्ध झाली आहे.
NYPS 2.0 अंतर्गत आता देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विविध गट तसेच वैयक्तिक नागरिकांना अनुक्रमे संस्था सहभाग, गट सहभाग आणि वैयक्तिक सहभाग या माध्यमांतून या योजनेत सहभागी होता येणार आहे. यामुळे युवा संसद उपक्रम अधिक समावेशक आणि लोकाभिमुख ठरणार आहे.
११ सप्टेंबर २०२४ रोजी या योजनेची सुरुवात झाल्यापासून ते २७ जानेवारी २०२६ पर्यंत एकूण ९५,३१९ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला असून, तरुणांमध्ये संसदीय प्रक्रिया, धोरणनिर्मिती आणि लोकशाही मूल्यांबाबत वाढत असलेली उत्सुकता या आकडे वारीतून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांना संसद कार्यपद्धती, चर्चा-वादविवाद कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळत आहे.


