लोकयान २६ अंतर्गत आयएनएस सुदर्शनीचे आगमन

0
24
लोकयान २६ अंतर्गत आयएनएस सुदर्शनीचे आगमन
लोकयान २६ अंतर्गत आयएनएस सुदर्शनीचे आगमन

लोकयान २६ अंतर्गत आयएनएस सुदर्शनीचे आगमन

नवी दिल्ली l प्रतिनिधी

भारतीय नौदलाचे नौकानयन प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शनीने २ फेब्रुवारी २०२६ रोजी ओमानमधील सलालाह बंदरात यशस्वी प्रवेश करत आपल्या प्रतिष्ठित आंतरमहासागरीय प्रवास लोकयान २६ मधील पहिल्या आंतरराष्ट्रीय बंदरभेटीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. दहा महिन्यांच्या या व्यापक मोहिमेचा उद्देश भारताचा समृद्ध सागरी वारसा जागतिक पातळीवर सादर करणे तसेच आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य अधिक दृढ करणे हा आहे.

आयएनएस सुदर्शनीने २० जानेवारी २०२६ रोजी कोची येथील मूळ बंदरातून प्रस्थान केले होते. अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांचा सामना करत जहाजाने आपला पहिला सागरी टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. सलालाह बंदरातील आगमनामुळे भारत आणि ओमान यांच्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सागरी संबंध तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

तीन दिवसांच्या या बंदरभेटीदरम्यान ओमानच्या रॉयल नेव्हीसोबत विविध व्यावसायिक संवाद, अनु -भवांची देवाणघेवाण आणि संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी जागृती वाढविणे आणि लोकांमधील परस्पर संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हे जहाज शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकां साठी खुले ठेवण्यात येणार आहे.हा प्रवास भारताच्या गौरवशाली सागरी परंपरेचे प्रतीक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here