आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कुडाळ रेल्वे स्थानकात योग सत्राचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कुडाळ रेल्वे स्थानकात योग सत्राचे आयोजन
कुडाळ, दि. २१ : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (#IDY2026) कुडाळ रेल्वे स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहात योग सत्रात सहभाग घेतला. निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांसह कर्मचारी वर्गाने विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. नियमित योगाभ्यासामुळे तणावमुक्त जीवन, कार्यक्षमता वाढ आणि उत्तम आरोग्य लाभते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला रेल्वे कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.