‘पानवल धरणाचे मजबूतीकरण व नूतनीकरण’ कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

0
23
'पानवल धरणाचे मजबूतीकरण व नूतनीकरण' कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
'पानवल धरणाचे मजबूतीकरण व नूतनीकरण' कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

‘पानवल धरणाचे मजबूतीकरण व नूतनीकरण’ कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विशेष स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ‘पानवल धरणाचे मजबूतीकरण व नूतनीकरण’ कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष स्मार्ट सिटी योजनेमुळे रत्नागिरीला आधुनिक पायाभूत सुविधा मिळत आहेत. हा प्रकल्प केवळ एक धरणाचे काम नसून, रत्नागिरीला एका आधुनिक आणि स्मार्ट शहराकडे घेऊन जाणारे महत्त्वाचे पाऊल आहे. पानवल धरणाचे मजबूतीकरण आणि नूतनीकरण झाल्यामुळे रत्नागिरी शहर आणि परिसराचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, हे आमचे मुख्य ध्येय होते आणि आज ते पूर्णत्वास जात असल्याचा मला अभिमान आहे.
या प्रकल्पाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण केल्याबद्दल मी पाटबंधारे विभाग, मुख्याधिकारी, प्रांताधिकारी आणि सर्व संबंधित अभियंत्यांचे व कामगारांचे मनापासून कौतुक करतो. प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम केल्यामुळेच हा लोकार्पण सोहळा आज शक्य झाला आहे. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार सदैव कटिबद्ध असून, रस्ते, पाणी, पर्यटन या सर्वच क्षेत्रांत रत्नागिरीचा कायापालट करण्यासाठी येणाऱ्या काळातही असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले जातील, असे आश्वस्थ केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, पाणी पुरवठा सभापती निमेश नायर, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, भाजपाचे शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, महेश उर्फ बाबूशेठ म्हाप, बंड्याशेठ साळवी, स्मितल पावसकर, सर्व नगरसेवक, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी वैभव गारवे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील व इतर पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here