आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी सल्ला जाहीर; तुडतुडे, करपा व किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन

0
5
आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी सल्ला जाहीर; तुडतुडे, करपा व किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन
आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी सल्ला जाहीर; तुडतुडे, करपा व किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन

आंबा-काजू बागायतदारांसाठी  कृषी सल्ला जाहीर; तुडतुडे, करपा व किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन

वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली असून, काही काजूच्या झाडांवर मोहोरही दिसू लागला आहे. ढगाळ वातावरण आणि काही भागांत झालेल्या पावसामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत २४ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी कृषी सल्ला जाहीर करण्यात आला आहे. केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक वैभव शिंदे यांनी आंबा व काजू बागायतदारांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
आंबा पिकावरील कीड व रोग नियंत्रण
आंब्याच्या अनेक बागांमध्ये नवीन पालवी मोठ्या प्रमाणात आली असून, उर्वरित बागांमध्येही पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे. या अवस्थेत तुडतुडे किडीमुळे पालवीतील रस शोषला जाऊन नुकसान होऊ शकते. तसेच पालवीवर चिकटा पडून काळ्या बुरशीची वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन पालवीवर तुडतुडे किडीचा किंवा २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात. तुडतुडे नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन ९ मिली, तर करपा रोग नियंत्रणासाठी थायोफिनेट मिथाइल १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात स्वतंत्रपणे फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
फवारणीतील औषध पालवीवर व्यवस्थित चिकटण्यासाठी व समान रीतीने पसरविण्यासाठी शिफारशीनुसार स्टिकर व स्प्रेडरचा वापर करावा. कोवळ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास टोलफेनपायरॅड २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पालवीची वाढ जोमाने होण्यासाठी आणि ती लवकर परिपक्व होण्यासाठी ०:०:५० व १३:०:४५ ही पाण्यात विरघळणारी खते प्रत्येकी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात स्वतंत्रपणे फवारण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काजू पिकासाठीही उपाययोजना
काजूच्या वेंगुर्ला-१, वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-९ आणि वेंगुर्ला-१० या वाणांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे. वेंगुर्ला-१ आणि वेंगुर्ला-१० या वाणांच्या काही झाडांवर मोहोरही दिसू लागला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नवीन पालवीचे ढेकण्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांत नवीन पालवीतून मोहोर येऊन त्याची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी काजूच्या झाडांच्या बुंध्याभोवती जैविक आच्छादन करावे.
हवामानात फारसा बदल नाही
१६ ऑक्टोबर रोजीच्या मागील कृषी सल्ल्यानंतर हवामानात फारसा बदल झालेला नाही. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला असून, पहाटेच्या वेळी थंडीत किंचित वाढ झाली आहे. मागील आठवड्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसा हवेतील आर्द्रता कमी होऊन तापमान वाढल्याने उष्णतेची स्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here