आज शनिवार दि. २७ जून रोजी ३५३ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा

0
20
आज शनिवार दि. २७ जून रोजी ३५३ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
आज शनिवार दि. २७ जून रोजी ३५३ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा

आज शनिवार दि. २७ जून रोजी ३५३ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा

राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. २६ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा ३५३ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शिवशक ३५३, शनिवार दि. २७ जून २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने विविध शिवप्रेमी संघटना, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने राज्यभर शिवप्रतिमांचे पूजन, अभिवादन, मिरवणुका, व्याख्याने, पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य, सुशासन, शौर्य आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ (ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार) रोजी रायगडावर राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना केली होती. पारंपरिक हिंदू पंचांगानुसार हा सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला साजरा केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here