जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून कार्यालय परिसरात १५५ हून अधिक वृक्षांची लागवड

0
22
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून कार्यालय परिसरात १५५ हून अधिक वृक्षांची लागवड
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून कार्यालय परिसरात १५५ हून अधिक वृक्षांची लागवड

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून कार्यालय परिसरात १५५ हून अधिक वृक्षांची लागवड

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

सिंधुदुर्ग
 पर्यावरण संवर्धनाचा दृढ संदेश देत ‘हरित जिल्हाधिकारी कार्यालय’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १५५ हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते कार्यालय परिसरातील तुळशी वृंदावनात शास्त्रोक्त पद्धतीने रोप लावून करण्यात आला. यावेळी पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक शाखेला स्वतंत्र जागा निश्चित करून त्या ठिकाणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षलागवड केली. सामूहिक सहभागातून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा आदर्श या मोहिमेतून घालून देण्यात आला.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी या हरित उपक्रमाचे कौतुक करत प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी केवळ वृक्षलागवडच नव्हे, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचाही निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर अधिक हिरवागार, पर्यावरणपूरक आणि निसर्गसंपन्न बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here