सिंधुदुर्गच्या अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मिस्टर युनिव्हर्स बॉडी बिल्डिंग’ स्पर्धेत रौप्य व कांस्य पदकाची कमाई

0
17
श्री.अमित कदम "मिस्टर युनिव्हर्स बॉडी बिल्डिंग" या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश.
श्री.अमित कदम "मिस्टर युनिव्हर्स बॉडी बिल्डिंग" या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश.

सिंधुदुर्गच्या अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मिस्टर युनिव्हर्स बॉडी बिल्डिंग’ स्पर्धेत रौप्य व कांस्य पदकाची कमाई

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हरकुळ गावचे सुपुत्र अमित कदम यांनी थायलंडची राजधानी बँकॉक येथे आयोजित प्रतिष्ठित ‘मिस्टर युनिव्हर्स बॉडी बिल्डिंग’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत भारतासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.

या स्पर्धेत अमित कदम यांनी बॉडी बिल्डिंग प्रकारात रौप्य पदक तर क्लासिक फिजिक प्रकारात कांस्य पदक पटकावत आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशानंतर अमित कदम यांनी कणकवली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अमित कदम यांच्या यशामुळे सिंधुदुर्गातील युवकांना क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जागतिक स्तरावर यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here