आदगाव (श्रीवर्धन) येथे CMEGP कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
31
आदगाव (श्रीवर्धन) येथे CMEGP कार्यक्रम उत्साहात संपन्न
आदगाव (श्रीवर्धन) येथे CMEGP कार्यक्रम उत्साहात संपन्न

आदगाव (श्रीवर्धन) येथे CMEGP कार्यक्रम उत्साहात संपन्न

रायगड : रायगड जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथे शनिवारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

जिल्हा उद्योग केंद्र आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या कार्यक्रमातून स्थानिक युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजकता वाढवून ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विविध योजनांची माहिती देत इच्छुक लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांमध्ये उद्योग उभारणीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here