उद्धव ठाकरे यांचे विधानसभा अध्यक्षांना स्मरणपत्र

0
48
उद्धव ठाकरे यांचे विधानसभा अध्यक्षांना स्मरणपत्र
उद्धव ठाकरे यांचे विधानसभा अध्यक्षांना स्मरणपत्र

उद्धव ठाकरे यांचे विधानसभा अध्यक्षांना स्मरणपत्र

मुंबई : महाराष्ट्रात २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड होणे अपेक्षित असताना अद्यापही नियुक्ती न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन स्मरणपत्र सादर केले.

राज्यातील लोकशाही प्रक्रियेसाठी विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे असून, त्याची नियुक्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मुद्द्यावर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या भेटीदरम्यान विधीमंडळ गटनेते आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेते भास्कर जाधव, विधानपरिषद गटनेते ॲड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, आमदार वरुण सरदेसाई, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, आमदार कैलास पाटील आणि आमदार संजय देरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here