आदमापूर अमावस्या यात्रेत एसटीचे विक्रमी यश : २ दिवसांत २१ लाखांचे उत्पन्न
आदमापूर येथील संतश्रेष्ठ बाळूमामा अमावस्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, दि. १९ व २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला तब्बल २१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
या काळात ३८ बसेसद्वारे ६३४ फेऱ्या चालवत सुमारे ३४,४३४ भाविकांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली. विशेष नियोजनाअंतर्गत कोल्हापूर–आदमापूर व आदमापूर–निपाणी मार्गांवर दर १५ मिनिटांनी बससेवा देण्यात आली.
या प्रभावी व्यवस्थापनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे १० लाख रुपयांनी अधिक उत्पन्न मिळाल्याचे एसटी महामंडळाने नमूद केले आहे.


