‘प्रशासन गांव की ओर’ सुशासन सप्ताह २०२५ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात जनजागृती कार्यशाळांचे आयोजन
रत्नागिरी : भारत सरकारच्या निर्देशानुसार ‘प्रशासन गांव की ओर’ उपक्रमांतर्गत दि. १९ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुशासन सप्ताह २०२५ राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये दि. २० ते २४ डिसेंबरदरम्यान जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांना नागरिक, लाभार्थी, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत प्रतिनिधी व इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, शिक्षण सहाय्य, आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व इतर कल्याणकारी योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, अटी-शर्ती व तक्रार निवारणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यशाळांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
- दि. २० डिसेंबर २०२६, सकाळी ११ वा. – रत्नागिरी: एस.पी. हेगशेट्ये कॉलेज, मिरजोळे; संगमेश्वर: कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, नावडी
- दि. २२ डिसेंबर २०२६, सकाळी ११ वा. – मंडणगड: लो. गोपिनाथ मुंडे कॉलेज
- दि. २३ डिसेंबर २०२६, सकाळी ११ वा. – खेड: पद्मश्री एस. एम. अण्णासाहेब बेहरे इन्स्टिट्यूट, दापोली: दापोली सिनीअर अर्बन कॉलेज, गुहागर: व्ही.पी.एम. महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर
- दि. २४ डिसेंबर २०२६ – चिपळूण: डी.बी.जे. महाविद्यालय (सकाळी ११ वा.), लांजा: तुकाराम पुंडलिक शेट्ये कॉलेज (सकाळी ११ वा.), राजापूर: गाडे दाते कॉलेज (दुपारी २ वा.)
या कार्यशाळांद्वारे शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


