आदिवासी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी क्लस्टर विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

0
16
आदिवासी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी क्लस्टर विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

आदिवासी उत्पादनांच्या प्रभावी विपणनासाठी क्लस्टर विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई :
लोकभवन येथे अनुसूचित क्षेत्रातील समूहविकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) या विषयावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास विभागासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक पार पडली. यावेळी आदिवासी भागातील उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.
यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, आदिवासी भागात बांबू, वेत, आयुर्वेदिक उत्पादने, लघु वनउत्पादने यांसारखी अनेक दर्जेदार उत्पादने तयार होतात. मात्र, या उत्पादनांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्रभावी विपणन आहे. त्यामुळे प्रत्येक आदिवासी गावाची उत्पादन क्षमता, उपलब्ध बाजारपेठ आणि उत्पादकांना मिळणारे उत्पन्न यांचा सखोल अभ्यास करून दीर्घकालीन विपणन धोरण तयार करणे आवश्यक आहे. आदिवासी क्षेत्रात शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करून प्रत्येक आदिवासी गावाचे स्वावलंबी आणि आदर्श गावात रूपांतर करण्यासाठी क्लस्टर विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. उत्पादनांच्या गुणवत्तेबरोबरच आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्रात मुंबईसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने आदिवासी उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष विपणन धोरण राबविणे तसेच आवश्यकतेनुसार कॉर्पोरेट संस्थांशी भागीदारी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या बैठकीस राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निलेश सागर, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तसेच विविध प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here