‘आपली जमीन, आपले हक्क’ कॉमिकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

0
20
'आपली जमीन, आपले हक्क' कॉमिकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
'आपली जमीन, आपले हक्क' कॉमिकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

‘आपली जमीन, आपले हक्क’ कॉमिकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

वनहक्क, शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम

पालघर, दि. २८ : विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आदिवासी समाजात वनहक्क आणि विविध शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘आपली जमीन, आपले हक्क’ या कॉमिकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तारापूर येथे करण्यात आले.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत वैयक्तिक आणि सामूहिक वनहक्क (वनपट्टे), तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कुटुंबांना मदत करावी. या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
‘आपली जमीन, आपले हक्क’ हे कॉमिक आदिवासी समाजासाठी वनहक्क कायदा, आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर प्रक्रिया आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती सोप्या व चित्रमय स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. यामुळे कायदेशीर नोंदी अद्ययावत करण्यास मदत होऊन आदिवासी समुदाय अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here