‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’च्या प्रॅक्टिस रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
12
'कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७'च्या प्रॅक्टिस रनला उत्स्फूर्त प्रतिसाद
'कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७'च्या प्रॅक्टिस रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’च्या प्रॅक्टिस रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

क्रीडा व पर्यटनाला चालना देणारा उपक्रम – उदय सामंत

रत्नागिरी, दि. २८ : रत्नागिरीतील थिबा पॅलेस रोडवरील जयेश मंगल कार्यालय येथे आयोजित **’कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’**च्या प्रॅक्टिस रन आणि सन्मान सोहळ्यास पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला.

यावेळी दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून रत्नागिरीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचविणारे क्रीडापटू अभिजीत पड्यार आणि प्रसाद देवस्थळी, सायकल एव्हरेस्टिंग पूर्ण करणारे अथर्व शेंडे, तसेच एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी करणारे गिर्यारोहक राहुल गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले की, कोकणातील क्रीडा संस्कृती आणि पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे ही केवळ स्पर्धा नसून निरोगी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा स्वीकार आहे. वाढत्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक खेळाडू, क्रीडा संस्था आणि अशा उपक्रमांना राज्य शासनाकडून नेहमीच सर्वतोपरी सहकार्य आणि प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी आगामी ‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७’ स्पर्धेसाठी सर्व धावपटू आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख राहुल पंडित, रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई, रत्नागिरी सायकलिंग क्लबचे महेश सावंत, प्रसाद देवस्थळी तसेच क्रीडाप्रेमी, धावपटू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here