आमदार निलेश राणे यांची माजी आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी भेट; प्रकृतीची केली विचारपूस
आमदार निलेश राणे यांची माजी आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी भेट; प्रकृतीची केली विचारपूस
राजापूर :
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांच्यावर नुकतीच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी निलेश राणे यांनी राजन साळवी यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि त्यांनी पुन्हा एकदा जनसेवेच्या कार्यात सक्रिय व्हावे, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
या भेटीच्या माध्यमातून राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन व्यक्त झालेल्या आपुलकीची आणि सद्भावनेची चर्चा होत आहे.