आयएसएसएफ विश्वचषकात ईशा सिंह व मनू भाकर यांची सुवर्ण कामगिरी

0
10
आयएसएसएफ विश्वचषकात ईशा सिंह व मनू भाकर यांची सुवर्ण कामगिरी
आयएसएसएफ विश्वचषकात ईशा सिंह व मनू भाकर यांची सुवर्ण कामगिरी

आयएसएसएफ विश्वचषकात ईशा सिंह व मनू भाकर यांची सुवर्ण कामगिरी

शरद पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई | प्रतिनिधी
आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिला २५ मीटर पिस्तुल प्रकारात सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणाऱ्या ईशा सिंह तसेच दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय महिला नेमबाजांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढत दोन्ही खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शरद पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ईशा सिंह आणि मनू भाकर यांनी आपल्या अविरत परिश्रम, कडक शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर भारतीय तिरंग्याचा गौरव उंचावला आहे. त्यांची ही कामगिरी केवळ पदक जिंकण्यापुरती मर्यादित नसून देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
प्रत्येक सरावातील मेहनत, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशातून समर्पण, चिकाटी आणि धैर्याचे दर्शन घडते, जे प्रत्येक खेळाडूसाठी आदर्शवत असल्याचे पवार यांनी नमूद केले.
भारतीय महिला नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले असून भविष्यातही त्यांच्याकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. ईशा सिंह आणि मनू भाकर यांच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here