
पालघरमधील अतिवृष्टी व पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा; मदत कार्यात कोणतीही कुचराई होऊ देऊ नका – गणेश नाईक
मुंबई | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सुरू असलेल्या मदत व पुनर्वसन कार्याचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत पालघर जिल्ह्यातील परिस्थिती, बाधित नागरिकांना दिली जाणारी मदत तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.


