विमानसेवा बंद असतानाही खजुराहो विमानतळ ग्राहक समाधानात देशात अव्वल
AAI निर्देशांकात प्रथम क्रमांक
खजुराहो | वृत्तसंस्था
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) २०२६ च्या ग्राहक समाधान निर्देशांकात मध्य प्रदेशातील खजुराहो विमानतळाने उल्लेखनीय कामगिरी करत देशातील सर्वाधिक ग्राहक समाधान मिळविणारा विमानतळ म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विमानतळाला ५ पैकी ४.९८ गुण मिळाले असून ग्राहक सेवा आणि सुविधांच्या गुणवत्तेबाबत सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे.



