आयडीएफसी फर्स्ट आणि एयू स्मॉल फायनान्स बँका पॅनेलमधून बाहेर

0
26
आयडीएफसी फर्स्ट आणि एयू स्मॉल फायनान्स बँका पॅनेलमधून बाहेर
आयडीएफसी फर्स्ट आणि एयू स्मॉल फायनान्स बँका पॅनेलमधून बाहेर

आयडीएफसी फर्स्ट आणि एयू स्मॉल फायनान्स बँका पॅनेलमधून बाहेर

चंदीगड :

फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर हरियाणा सरकारने Iआयडीएफसी फर्स्ट आणि एयू स्मॉल फायनान्स बँक या दोन बँकांना अधिकृत पॅनेलमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सोमवारी शेअर बाजारात दोन्ही बँकांच्या समभागांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स सुमारे १६ टक्क्यांनी घसरले, तर एयू स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ५ टक्क्यांनी खाली आले.

आयडीएफसी फर्स्ट बँकेने आपल्या काही कर्मचाऱ्यांकडून तब्बल ५९० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची कबुली दिल्यानंतर सरकारने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे, एयू स्मॉल फायनान्स बँकेनेही सरकारी खात्यात ४७ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराची माहिती समोर आणली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही बँकांविरुद्ध तातडीने पावले उचलण्यात आली.

पॅनेलमधून वगळल्याचा थेट परिणाम एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या सरकारी ठेवींवर झाल्याचे दिसून आले आहे. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हरियाणा सरकारच्या विविध विभागांकडील सुमारे ७३५ कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत होत्या. मात्र २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही रक्कम घटून सुमारे ५३८ कोटी रुपयांवर आली. या घडामोडींमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here