आरोग्य विभागातील २० वर्षांचा तिढा सुटला; १९५ डॉक्टरांना सेवाखंड क्षमापित पत्रे

0
126

मुंबई :l प्रतिनिधी
आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या सुमारे २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा निघाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

या निर्णयाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानत, दीर्घकाळ रखडलेल्या न्याय्य मागणीची पूर्तता झाल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी मंत्री आबिटकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासन कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत सकारात्मक असून, बदल्यात डॉक्टरांनी जनतेला अधिक दर्जेदार आणि संवेदनशील आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. चांगले कार्य केल्यास शासन सदैव पाठीशी उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here