इंदोर महापालिकेच्या अभ्यासगटाची नवी मुंबईला भेट

0
93
इंदोर महापालिकेच्या अभ्यासगटाची नवी मुंबईला भेट
इंदोर महापालिकेच्या अभ्यासगटाची नवी मुंबईला भेट

इंदोर महापालिकेच्या अभ्यासगटाची नवी मुंबईला भेट

 आधुनिक प्रकल्पांची प्रशंसा

नवी मुंबई : ‘सुपर स्वच्छ लीग’मधील अग्रणी शहर असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेला इंदोर महानगरपालिकेच्या अभ्यासगटाने दोन दिवसीय भेट दिली. या दौऱ्यात स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प पाहून इंदोरच्या अभ्यासगटाने नवी मुंबईचे विशेष कौतुक केले.

महापालिका मुख्यालयातील अत्याधुनिक सुविधा, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेचे रिअल-टाइम निरीक्षण, मायक्रोचिप व जीपीएस आधारित प्रणाली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वस्त्र कचरा पुनर्प्रक्रिया केंद्र, नेरूळ येथील वंडर्स पार्क व प्रस्तावित सायन्स पार्क, कॅन्सर रजिस्ट्री व डायलेसिस केंद्र यांसारख्या उपक्रमांनीही ते प्रभावित झाले.

कोपरखैरणे येथील मियावाकी शहरी जंगल, सी-टेक मलप्रक्रिया केंद्रातील पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर तसेच ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान स्मारकाचे ही त्यांनी विशेष कौतुक केले.

स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव प्रकल्पांमुळे नवी मुंबई हे खरोखरच नाविन्यपूर्ण शहर असल्याचे मत व्यक्त करत, इंदोरच्या अभ्यासगटाने नवी मुंबईच्या आतिथ्यशीलतेबद्दल समाधान व्यक्त केले आणि इंदोरला भेट देण्याचे आमंत्रण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here