बदलापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

0
292
बदलापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
बदलापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

बदलापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

 निवारा केंद्र उभारण्याची भाजपची मागणी

बदलापूर : बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या व चावा घेण्याच्या घटना वाढत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष (ग्रामीण) व नवनिर्वाचित नगरसेविका सौ. रती नंदकिशोर (राम) पातकर यांनी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पत्र देऊन शहरात तातडीने भटक्या कुत्र्यांसाठी निवारा व संगोपन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्जंतुकीकरण, लसीकरण, निवारा व्यवस्था व तक्रार निवारण यंत्रणा राबविण्यात येत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच मोकळ्या भूखंडांचा तात्पुरत्या निवाऱ्यासाठी वापर, कालमर्यादेत ABC व लसीकरण, २४x७ हेल्पलाईन आणि कुत्र्यांसाठी निश्चित खाद्यस्थळे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या उपाययोजनांमुळे नागरिकांचे प्राण वाचतील आणि भटक्या कुत्र्यांनाही सुरक्षित व मानवी वागणूक मिळेल, असे सांगत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी विनंती सौ. पातकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here