इराणचा दावा : अमेरिकेच्या ‘USS अब्राहम लिंकन’ विमानवाहू जहाजावर ४ क्षेपणास्त्रांचा हल्ला

0
22
Irak-Iran war -हॉर्मुझ सामुद्रधुनीत तणाव; ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
Irak-Iran war -हॉर्मुझ सामुद्रधुनीत तणाव; ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

इराणचा दावा : अमेरिकेच्या ‘USS अब्राहम लिंकन’ विमानवाहू जहाजावर ४ क्षेपणास्त्रांचा हल्ला

मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन’ या विमानवाहू युद्धनौकेवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे.

हा हल्ला अमेरिकन-इस्रायली कारवाईला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे.

इराणच्या निवेदना नुसार, “अब्राहम लिंकन” जहाजावर चार क्षेपणास्त्रे आदळली असून ही कारवाई त्यांच्या लष्करी मोहिमेचा भाग असल्याचे म्हटले आहे. तसेच इराणने चेतावणी देताना जमीन आणि समुद्र दोन्ही आक्रमकांसाठी “कबरस्थान ठरतील” असेही वक्तव्य केले.

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणचा हा दावा फेटाळून लावला आहे. अमेरिकन लष्कराच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्रे जहाजाच्या जवळही पोहोचली नाहीत आणि जहाजाला कोणतीही हानी झालेली नाही. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून मध्यपूर्वेत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जागतिक बाजारपेठांवरही या घडामोडींचा परिणाम दिसू लागला असून तेल आणि सोन्याच्या किमतीं मध्ये चढउतार होत आहेत. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्या चे तज्ज्ञांचे मत आहे.अनेक देशांकडून संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here