इराणमधील तणावामुळे भारत सरकारने जारी केली प्रवास सूचना; नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. यामुळे भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवास करण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार, इराणमध्ये सध्या अवश्यक नसलेला (Non-essential) प्रवास टाळावा. कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी सध्या इराणमध्ये असलेल्या नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी.
भारतीय नागरिकांनी स्थानिक बातम्या आणि घडामोडींवर सतत लक्ष ठेवावे, तसेच तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांच्या संपर्कात राहून जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
ज्या नागरिकांनी तिथे निवासी व्हिसावर राहणी घेतली आहे, पण अद्याप आपली नोंदणी दूतावासाकडे केलेली नाही, त्यांनी तातडीने आपली माहिती दूतावासाकडे नोंदवावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे सोपे होईल.


