उबाठा गटाला कणकवलीत धक्का; सचिन सावंत यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
उबाठा गटाला कणकवलीत धक्का; सचिन सावंत यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
नितेश राणे यांच्या ‘ओम गणेश’ निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा
कणकवली
उबाठा गटाचे कणकवली विधानसभा समन्वयक श्री.सचिन सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.
सचिन सावंत यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
उबाठा गटाचे कणकवली विधानसभा समन्वयक श्री.सचिन सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कणकवलीतील नितेश राणेंच्या ‘ओम गणेश’ निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि.प.सदस्य संदीप गावडे, माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत, सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आदी उपस्थित होते.
प्रवेशकर्त्यांमधे कसवन माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, सतीश सापळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद गांवकर, विलास सावंत, सखाराम घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, सुरेश गुरव, वैभव शेटये, सत्यवान मेस्त्री, अजित मेस्त्री, हळवल माजी उपसरपंच विष्णू ठाकूर, दिलीप ठाकूर, राज सावंत, मंगेश राजाध्यक्ष, उमेश मेस्त्री यांसह उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.