गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक

0
14
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक

मंत्री उदय सामंत यांचा साहित्यिकांशी संवाद; मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा

गोंदिया :
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ तसेच उदयोन्मुख साहित्यिकांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. साहित्यिकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासोबतच मराठी भाषेला अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “आपली मायमराठी ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर आपला अभिमान आणि संस्कृतीचा मोठा वारसा आहे. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.”
शाळांपासून प्रशासकीय स्तरापर्यंत मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम हाती घेण्यात येणार असून, स्थानिक लेखकांच्या पुस्तकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत तसेच ग्रंथालयांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी, साहित्यिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी महायुती शासन कटिबद्ध असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला मराठी भाषा विभागाचे संचालक शामकांत देवरे यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील अनेक मान्यवर साहित्यिक, लेखक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here