उसवाड व जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘एनक्वास’ मानांकन

0
84
उसवाड व जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘एनक्वास’ मानांकन
उसवाड व जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘एनक्वास’ मानांकन

उसवाड व जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘एनक्वास’ मानांकन

नाशिक l

नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत भर घालत चांदवड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड आणि नाशिक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जातेगाव यांना नॅशनल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स स्टँडर्ड (NQAS) अंतर्गत गुणवत्ता प्रमाणपत्र (Quality Certification) प्राप्त झाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात येणारे हे मानांकन रुग्णसेवा, स्वच्छता, उपचार पद्धती, व्यवस्थापन आणि एकूण सेवा गुणवत्तेच्या निकषांवर आधारित असते. या मानांकनामुळे संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांनी दर्जेदार व रुग्णाभिमुख सेवा पुरवण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे अधोरेखित झाले आहे.

या यशामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेचेही हे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.

NQAS म्हणजे काय?

नॅशनल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स स्टँडर्ड (NQAS) हे केंद्र सरकारचे गुणवत्ता मानांकन आहे. स्वच्छता, रुग्णसेवा, औषधे, कर्मचारी कार्यक्षमता व सुरक्षिततेच्या निकषांवर तपासणी करून 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या आरोग्य केंद्रांना हे प्रमाणपत्र दिले जाते. या योजनेअंतर्गत प्राथमिक, उपप्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांच्या सेवांचे सखोल मूल्यांकन करून गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या संस्थांना मानांकन दिले जाते.
NQAS अंतर्गत आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णसेवा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषध उपलब्धता, वैद्यकीय उपकरणांची स्थिती, कर्मचारी कार्यक्षमता, प्रशासन व रुग्ण सुरक्षितता अशा सहा प्रमुख निकषांवर तपासणी केली जाते. जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावरील पथकांकडून टप्प्याटप्प्याने मूल्यांकन केले जाते. या प्रक्रियेत किमान 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या आरोग्य संस्थांनाच गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाते.
हे मानांकन मिळाल्यानंतर संबंधित आरोग्य केंद्राला दर्जेदार व सुरक्षित सेवा देणारी संस्था म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते. यामुळे रुग्णांचा विश्वास वाढतो, कर्मचारी अधिक जबाबदारीने काम करतात आणि आरोग्य सेवेत सातत्याने सुधारणा करण्यास चालना मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here