एअर इंडियाची भारत व कॅनडामधील फ्लाइट्स मध्ये +३०% कपात.
जेट इंधनाच्या वाढत्या किमती आणि मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे एअर इंडियाने एप्रिल आणि मे २०२६ पर्यंत भारत आणि कॅनडा दरम्यानच्या (दिल्ली – टोरांतो व दिल्ली – वॅनकुवर) उड्डाणांमध्ये लक्षणीय घट केली आहे.
प्रमुख तथ्ये : विमान वाहतूक डेटा ट्रॅकर सिरियमच्या माहितीनुसार, टोरोंटो आणि दिल्ली दरम्यानच्या ये-जा करणाऱ्या उड्डाणांची संख्या मार्चमधील ४८ वरून मे महिन्यात ३१ पर्यंत घसरली आहे, ही ३५% घट आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी जून आणि जुलैमध्ये आणखी कपात करण्याचे नियोजन असल्याचे संकेत दिले आहेत जर जेट इंधन मध्ये दरवाढ झाली तर.
या कपातीमुळे भारतात जाणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी प्रवासाचे पर्याय मर्यादित झाले आहेत आणि तिकिटांच्या किमती पण वाढल्या आहेत.
एअरलाइनने पुष्टी केली आहे की या वेळा पत्रकातील कपातीचा परिणाम मे महिन्यातील सेवांवर झाला असून पुढील महिन्यांमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे.


