एआयच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाची चिंता
नवी दिल्ली :
याचिका दाखल करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा वाढता वापर आणि त्यातून अस्तित्वात नसलेल्या निकालांचा उल्लेख होत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालय यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वकिलांकडून एआयच्या अतिरेक वापरावर नाराजी व्यक्त केली.
“काही वकिलांनी याचिका तयार करण्यासाठी एआयचा वापर सुरू केला आहे हे पाहून आम्हाला चिंता वाटते. हे पूर्णपणे अनावश्यक आहे,” असे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने नमूद केले.
राजकीय भाषणांबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करत शिक्षणतज्ज्ञ रूप रेखा वर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
न्यायमूर्ती नागरत्न यांनी ‘दया विरुद्ध मानवजात’ या अस्तित्वात नसलेल्या निकालाचा अलीकडेच उल्लेख आढळल्याचे सांगितले. तसेच काही प्रकरणांमध्ये खरे निकाल दिले जातात, परंतु त्यातील मजकूर चुकीच्या पद्धतीने उद्धृत केला जातो, ज्यामुळे पडताळणी करणे कठीण होते, असेही त्यांनी
(पान ४ वर)


