एक घंटा, एक साथ’ अभियानांतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम

0
15

रत्नागिरी :
‘एक घंटा, एक साथ’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे ट्रॅकवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत आरआरएम कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छता केली.
आरआरएम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी
आरआरएम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी
या अभियानात खेडशी हायस्कूलमधील सुमारे ८० विद्यार्थी आणि शिक्षकांनीही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्टेशन परिसरात प्रभातफेरी काढत स्वच्छतेचा संदेश दिला. रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
रेल्वे प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागामुळे ‘एक घंटा, एक साथ’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here